प्रियांका चोप्रा बॉलिवूडची सर्वात महाग अभिनेत्री

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे भाव सुद्धा वाढत चालले आहेत. परंतु या स्पर्धेत बाजी मारली आहे ती प्रियांका चोप्राने. जया भादुरीने मुख्य भूमिका केलेल्या १९७० मध्ये गाजलेल्या ’जंजीर’ या चित्रपटाचा रिमेक होणार आहे. या चित्रपटाची मुख्य भूमिका प्रियांका चोप्रा करणार असून तिला या चित्रपटासाठी चक्क ११ कोटी रूपयांची ऑफर मिळाली आहे. या ऑफरने प्रियांका चोप्राने करीना कपूरला सुद्धा मागे टाकले आहे. नुकत्याच मधुर भंडारकरच्या ’हिरोईन’ या चित्रपटासाठी तिला ८ कोटी रूपयांची ऑफर मिळाली होती.
’जंजीर’ हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात प्रियांकाने एका बोल्ड एनआरआय कॅफे ओनरच्या मालकीणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा ही अमिताभ बच्चनच्या ’डॉन’, ’अग्निपथ’ आणि आता ’जंजीर’ अशा तीन हिट चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम करणारी एकमेव अभिनेत्री म्हणून ओळखली जाणार आहे.

Leave a Comment