पाच नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली, दि.४ – धानोरा तालुक्यातील पुस्टोला गावाजवळ २७ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी भू-सुरूंग स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे वाहन उडविले होते. या प्रकरणात सहभाग असल्याच्या कारणावरून धानोरा पोलिसांनी १ एप्रिल रोजी पाच नक्षल्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
  भू – सुरुंग स्फोटात केंद्रीय राखीव दलाचे १२ जवान शहीद झाले होते तर २९ जवान जखमी झाले. याप्रकरणी धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नक्षलविरोधी अभियान राबविताना १ मार्च रोजी धानोरा पोलिसांनी चातगाव एरिया कमिटीमधील रक्षा पार्टीचे उपाध्यक्ष नानाजी चमरू पदा, मिलीशिया दमलचे कमांडर दशरथ किदू हलामी, रिचू ऊर्फ नरेश संतू झुरी, राहुल रामा आतला, पुस्टोला व रंगीत श्रीमद वैद्य यांना अटक केली आहे. २ एप्रिल रोजी त्यांना धानोरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment