
नाशिक, दि. २२- चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जन्मगावी म्हणजेच नाशिक शहरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विविध लघुपट, माहितीपट तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचा महोत्सव संप्पन्न होणार आहे. गुढी पाडव्यापासून तीन दिवस हा महोत्सव चालणार असून शहरातील गंगापूर रोडवरील राम बाग परिसरात हा महोत्सव पार पडणार आहे.
प्रकृती द पंच, सेव्ह अव्हर प्लॅनेट्, रन अवे ऑन द् सी, यासारखी वृत्त चित्रे तसेच सेव्ह द गर्ल चाईल्ड, प्रोजेक्ट ११ या सारखे लघुपट नाशिककरांना बघण्याचे संधी मिळणार आहे. फ्रान्स, युरोप येथील सहजासहजी न बघावयास मिळणारे चांगले चित्रपट या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नागरिकांना बघावयाला मिळणार आहेत. तसेच मास्टर वर्कशॉप व या क्षेत्रातील अनेक दिग्गजांबरोबर चर्चा करण्याची व सहभागी होण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
नाशिक येथे अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे.