‘सीमी’ला बंदीबाबत कारणे दाखवा नोटीस

स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमानुसार बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ती जाहीर का करू नये? याबाबत न्यायाधिकरणाने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या खटल्यावर येत्या ११ एप्रिल रोजी न्यायाधिकरणासमोर सुनावणी होणार असून सदर सुनावणीस पुणे जिल्ह्यातील सीमीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांमाफत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नुकत्याच सीमी कार्यकर्त्यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या एटीएस कार्यवाहीच्या पार्वश्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून समजले आहे.

Leave a Comment