तिरुनेलवेली, दि. ३० – तामिळनाडूच्या कृष्णापूरम येथील व्यंकटचलपती या सोळाव्या शतकातील मंदिरात शुक्रवारी दोन देशी बनावटीची स्फोटके सापडली. ही स्फोटके मंदिराच्या छपरावर दडवून ठेवली होती. मात्र बॉम्ब विरोधी पथकाने ही स्फोटके वेळीच निकामी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. येथील कर्मचारी मंदिराची साफसफाई करीत असताना त्यांना ही स्फोटके आढळून आली. त्यांनी लगेचच हे पोलिसांच्या निदर्शनास आणले. या प्रकाराची आम्ही चौकशी करीत असून, यामागे धार्मिक संघटनांचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.