मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे ५ रूग्ण स्वाईन फ्ल्यू निदानासाठी कस्तुरबा रूग्णालय सज्ज

मुंबई, दि. २९ – मुंबईत मुलुंड येथे दोन व आणखी एका ठिकाणी तीन असे स्वाईन फ्ल्यूचे पाच रूग्ण आढळून आल्याने पुण्यापाठोपाठ मुंबईतही स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. त्यामुळे पालिका आरोग्य विभागाने कस्तुरबा रूग्णालयात व रेलिगर या खाजगी संस्थेमध्ये स्वाईन फ्ल्यू चाचणी, निदानासाठी व्यवस्था केली आहे.
  भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटकर यांनी मुंबईतील स्वाईन फ्ल्यू रूग्णाबाबत ही माहिती अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैस्कर यांच्याकडे मागितली होती. त्यावर म्हैस्कर यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ चाचणीसाठी कस्तुरबा रूग्णालयात पाठविण्यात यावे, अशी सूचना म्हैस्कर यांनी सर्व रूग्णालयांना दिली आहे. स्वाईन फ्ल्यू रोखण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत असून रूग्णालयात टॅमिफ्ल्यू गोळ्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, असे म्हैस्कर यांनी सांगितले.

Leave a Comment