भारतात उत्पादित झालेल्या बीएमडब्ल्यूच्या ३४२२ कारमध्ये दोष

मुंबई, दि. २९ – जर्मनीची मोटार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यू ३४२२ मोटार परत घेणार आहे. ५ व ६ श्रेणीतील या मोटारींचे बॅटरी केबल कव्हर सदोष असल्यामुळे कंपनीने मोटारी परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  २००७ ते २०१० मध्ये उत्पादित करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यूच्या ५ व ६ श्रेणींमधील सदोष बॅटरी केबल कव्हर एक महिन्याच्या आत बदलून दिले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. अशाचप्रकारे जगातील इतर देशांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदोष केबल बदलण्यास केवळ अर्धा तास लागणार असून ती विनामूल्य बदलून दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या दोन श्रेणीतील मोटार या जुन्या प्रकारातील असून यातील ५ व्या मालिकेतील मोटारी चेन्नई प्रकल्पात उत्पादित करण्यात आल्या आहेत तर ६ मालिकेतील मोटारी आयात करण्यात आल्या आहेत.   

Leave a Comment