ताडोबा – व्याघ्रप्रकल्पाचा प्रस्ताव अडचणीत

नागपूर, दि. २९ – चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पातील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव गेल्या एक वर्षांपासून सरकार दरबारी धूळखात पडला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक विभागाने पुर्नरचनेच्या पाठविलेल्या प्रस्तावामध्ये १०० अधिक पदांची मागणी केली आहे. मात्र, सरकारच्या उदासीन धोरणामुळे हा प्रस्ताव अडकला आहे.
  चंद्रपूर जिल्ह्यातील ६२५ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये पावसाळा वगळता वर्षातील ८ महिने पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटनाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यमान स्थितीत वनपालाचे एक पद आहे. मात्र, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हे मनुष्यबळ अतिशय अल्प प्रमाणात असल्याचे लक्षात आले. यामुळेच वन्यजीव विभागाने सरकारला कर्मचार्‍यांच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामध्ये पर्यटनाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि दोन वनपालांचा समावेश आहे.

Leave a Comment