नवी दिल्ली, दि. २८ – स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्यावर टीआरएस, टीडीपी आणि काँग्रेस सदस्यांनी बुधवारी सलग तिसर्या दिवशी लोकसभेत गदारोळ केला.
लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी जागेवर बसा असे वारंवार सांगूनही या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला. तसेच पोस्टर्स दाखवून आणि घोषणाबाजी करीत आपला विरोध दर्शविला. दरम्यान, सभागृहात गदारोळ वाढत चालल्यामुळे अध्यक्ष मीरा कुमार यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित केले.
बिहारमधील बरौनी थर्मल वीज संयंत्रासाठी कोळसा पुरवठ्यासाठी मागणी करत जेडीयूच्या सदस्यांनी देखील सभागृहात गदारोळ सुरू केला. या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात केवळ एकच प्रश्न मांडता आला.