करवाढीने महागाई आणखी भडकणार – कौशिक बसू

मुंबई, दि. २७ – सेवाकर व उत्पादन शुल्कामध्ये वाढ केल्याने महागाईमध्ये आणखी वाढ होईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी व्यक्त केला आहे. या करवाढीचे परिणाम सर्वप्रकारच्या सेवांवर होतील. त्यामुळे चलनवाढ ०.२५ ते ०.५० टक्क्यांनी वाढेल असे मतही त्यांनी व्यक्त केले.
 अर्थसंकल्पामध्ये उत्पादन शुल्कामध्ये व सेवाकरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सेवाकर १० टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यत वाढविण्यात आला आहे. वित्तीय तूट वाढत असल्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढत आहेत. महसूलात वाढ करण्यासाठी करांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला ४ हजार ९४० कोटी रूपयांचा महसूल मिळणार आहे, असेही बसू यांनी सांगितले. मात्र, ही करवाढ महागाई भडकविण्यात कारणीभूत ठरेल असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे. करवाढीचा परिणाम किमतींवर होणार असून किमती अर्धा टक्क्यांपर्यंत वाढतील असे बसू यांनी सांगितले. मात्र दीर्घ कालावधीमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यास फायदा होणार असून यामुळे चलनवाढ नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात चलनवाढ ०.५ टक्क्यांवर असेल तर वर्षभरासाठी चलनवाढीचा दर सरासरी पाच टक्के असेल असेही बसू  म्हणाले .

Leave a Comment