समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून सरकारी अधिकार्‍यावर गोळीबार

झांशी, दि. २६ – उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी न्यायव्यवस्थेला प्राधान्य देण्याचे आश्वासन देऊनही त्यांच्याच पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांकडून राज्यात वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने रविवारी मध्यरात्री झाशी येथे जिल्ह्याच्या विकास अधिकार्‍यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात हा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
   समाजवादी पक्षाच्या भगतसिंह यादव या नेत्याने सूड घेण्याच्या कारणावरून श्रीवास्तव या अधिकार्‍यावर गोळीबार केला. त्यांनी यादव यांच्याविरोधत गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अखिलेश यादव यांनी गुन्हेगारीला राज्यातून हद्दपार करण्याचे वक्तव्य केले होते. मात्र, समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडूनच असे प्रकार घडत आहेत.