अहमदाबाद, दि. २६ – उंटाच्या दुधाचा वापर वेगवेगळ्या उत्पादनांत करण्यासाठी गुजरात सरकार कछ जिल्हयात लवकरच व्यावसायिक डेअरी उघडणार आहे. यासाठी राज्य सरकारने २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदी केल्या आहेत.
यासंबधी सरकारला कछ जिल्हा सहकारी दुग्ध संघ यांच्याकडून प्रस्ताव मिळाला आहे. तसेच, दुध मिळण्यासाठी कछ उंट उछेरक मलधारी संघटन उभारण्यात आले आहे. उंटाच्या दुधाचे आर्थिक आणि पोषणाच्या दृष्टीने महत्त्व समजवण्याचे काम कछ स्थित एनजीओ सहजीवन करीत आहे. याचबरोबर, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन आणि अमूल यांनी उंटाच्या दुधाचे मार्केटिंग करण्याचे ठरविले आहे