कंदहार, दि. २६ – कंदाहारमधील दक्षिण भागात झालेल्या बॉम्बस्फोटात आठ अफगाणी सुरक्षा कर्मचारी आणि एक परदेशी सैनिक ठार झाले आहेत.
रविवारी रात्री तालिबानींनी आयईडीचा स्फोट केला असे शाह मोहम्मद यांनी सांगितले. प्रांतीय सरकारी प्रवक्ता झलमाई अयोबी यांनी सांगितले की, मृतांमध्ये आयएसएफचा एक सैनिक, सहा अफगाणी पोलिस, दोन अफगाणी सैनिक आणि परदेशी दलांसाठी काम करणारा एक अनुवादक यांचा समावेश आहे. कंदाहार तालिबानींचे जन्मभूमी आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबानींच्या हिंसाचारात २०११ मध्ये एकूण ३ हजार २१ नागरीक मारले गेले आहेत, असे संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे. २ हजार ९०० परदेशी सैनिक मारले गेले असल्याचेही सांगण्यात आले आहे.