गाय वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाची – डॉ. देखणे

पुणे, दि. २५ (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तेहतीस कोटी देवांचा वास असलेली गाय ही खर्‍या अर्थाने भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत डॉ. रामचंद्र देखणे यांनी काढले.नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ‘चेतन गोग्रास सेवा ट्रस्टतर्फे आयोजित गोमाता पूजन कार्यक्रमात डॉ. देखणे बोलत होते. यावेळी  ट*स्टचे अध्यक्ष कल्याण पाटील,  मनोहर कोलते, खिमजीभाई गाला उपस्थित होते.
डॉ. देखणे म्हणाले, हिंदू धर्मशास्त्रानुसार अग्नी, ब्रह्मा आणि गोग्रास अशी भगवंताची तीन मुखे आहेत. समाजामध्ये अन्न, पाणी, ध्वनी, हवा, रासायनिक आणि वैचारिक अशी सहा प्रकारची प्रदूषणे आढळून येतात. ही प्रदूषणे समाजाला अत्यंत घातक आहेत. यापासून दूर राहण्यासाठीच संतांच्या विचारांचे प्रबोधन समाजाला गरजेचे आहे. गाय केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, असे नसून तीचे महत्त्व विज्ञानाने देखील मान्य केले आहे. गायीच्या तुपाचा दिवा ऑक्सिजन देतो. त्यामुळे गायीचे महत्त्व हे धर्मशास्त्राप्रमाणे उच्च आहे, तसेच ते वैज्ञानिक दृष्ट्या देखील महत्त्वाचेच आहे.
मनोहर कोलते यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

Leave a Comment