भारत अमेरीका करणार खुल्या मंचाचे निर्माण

वॉशिंग्टन, दि. २४ – अमेरिका व भारत यांच्या एक खुला सरकारी मंच निर्माण करण्याच्या उपक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी ओबामा प्रशासनाचे दक्षिण व मध्य आशियातील प्रतिनिधी रॉबर्ट ब्लॅक पुढील आठवड्यात भारताचा दौरा करणार आहेत.  खुला सरकारी मंच हे एक वेब पोर्टल असून अमेरिका व भारत या दोन्ही देशांनी एकत्रितपणे केलेल्या कामाबद्दलची माहिती येथे उपलब्ध असेल. या मंचाद्वारे ही माहिती दोन्ही देशातील जनतेला व इतरांनाही उपलब्ध होऊ शकेल. ब्लॅक २९ व ३० मार्चला भारत दौरा करणार आहेत. या भेटीदरम्यान ते भारतीय अधिकार्‍यांशी या संदर्भात चर्चा करणार आहेत.
आपल्याबद्दलची माहिती जागातील अन्य देशांना उपलब्ध करुन देण्यासाठी भारत व अमेरिका या खुल्या मंचाचे निर्माण करणार आहे. त्यामुळे जगातील इतर देशांनादेखील प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांचा विकास व इतर गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या खुल्या मंचाची निर्मिती करण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारत व अमेरिकेचे विशेष पथक ऑगस्ट २०११ पासून या प्रकल्पावर काम करत आहे. ब्लॅक तझाकिस्तानहून दिल्ली येथे पोहचणार आहेत. तेथे त्यांनी मध्य आशियातील देशांचे प्रतिनिधी व इतर देशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय अर्थ संघटनचे अधिकारी व बिगर सरकारी संघटनांचे अधिकारी उपस्थित होते.  

Leave a Comment