बस दरीत कोसळून ५ ठार, ३३ जखमी

श्रीनगर, दि. २४- रामबान जिल्हयात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एक बस दरीत कोसळल्यामुळे पाच प्रवासी ठार झाले तर ३३ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस जम्मूहून श्रीनगरला जात होती. ही बस जम्मू -श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर घसरून तीनशे फूट खोल दरीत कोसळली. अपघातग्रस्तांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

Leave a Comment