सराफांचा संप- ग्राहक न घर का न घाटका !

सोने हा भारतीयांच्या दृष्टीने केवळ गुंतवणुकीचा विषय नसून तो तितकाच भावनिकही आहे.गेले तीन दिवस सोने चांदीच्या व्यापाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पतील
प्रस्तावित आयातशुल्कवाढीच्या च्या विरोधात पुकारलेला संप हा त्याचाच परिपाक आहे.  या संपाने आतापर्यंत ३००० कोटी  रुपयांचे नुकसान झाले आहे.
हि आकडेवारी केवळ व्यावसायिकांची आहे. याखेरीज ज्या ग्राहकांनी आपल्या मुलामुलींची लग्ने ठरविली असतील त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी
झाली आहे. त्यांना या संपामुळे वेळेत दागिने मिळाले नसल्यास होणार्या नुकसानीचे काय ?

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना  प्रणव मुखर्जी यांनी सोन्यावर आयात शुल्कात वाढ करताना हे पाऊल आपण जाणून बुजून उचलत आहोत असे सांगितले.
मुळात सरकारचा प्रस्ताव हा अल्प वाढ सुचविणारा आहे. दहा ग्रामला  ९० रुपये वाढ होणार असल्याने त्यावर एवढा गहजब व्यापाऱ्यांनी करणे योग्य
वाटत नाही. हि शुल्क वाढ व्यापारी भरणार नसून ती शेवटी ग्राहकाकडून वसूल केली जाणार आहे.

सोने हि जीवनावश्यक वस्तू नाही. आज सोन्याच्या भावात कितीही वाढ झाली तरी सराफाकडे जाणार्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.तिचा वापर सामान्य ग्राहक गुंतवणुकीसाठी मुख्यत्वे करतो.  अचानक संप पुकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांनी चर्चेचा मार्ग अनुसारायला हवा होता. जकात चुकवून सोने आणणाऱ्या काही व्यापार्यांना याआधी नोटीसा मिळाल्या होत्या हे विसरता येणार नाही.

या संपाने निर्माण झालेले प्रश्नही समजून घ्यायला हवेत.  कारण या बाजारात हातावर पोट असणारे अनेक कारागीर आहेत. त्यांच्या रोजच्या उतपन्नाचे  काय ?  आयात शुल्क वाढल्याने सोन्याचा काळाबाजार वाढेल अशी भीती व्यापारी व्यक्त करतात. याचा अर्थ सध्या कोणत्याच पातळीवर सोन्याची चोरटी  वाहतूक होत नाही का ? सोने खरेदीविक्रीपैकी किती व्यवहार पावतीशिवाय होतात ? सोन्याच्या भावात सट्टेबाजी होत नाही का ? जशी या प्रश्नाची उत्तरे शोधु न त्यावर नेमका उपाय होणे अवघड आहे तसेच सरकारी अधिकारी व्यावसायिकांना किती त्रास देतात हेही तपासावे लागेल.

चांदीत सट्टे झाले  आणि तो बुडबुडही   फुटला. अर्थमंत्र्यंचा हेतू कितीही स्वच्छ असला तरी नोकरशाही त्याची अंमलबजावणी अपेक्षित उद्दिष्टानुसार करते का या
प्रश्नाचे उत्तरही नकारार्थी आहे. त्यामुळे संप हे त्यावरील उत्तर नाही.आणि आयात शुल्क वाढही टाळता येईल. त्यापेक्षा करदात्यांचा पाया विस्तृत करण्यावर भर द्यायला हवा. या संपावर एक उत्तर मात्र नक्की आहे . ते महणजे ज्यांना सोने गुंतवणुकीसाठी खरेदी करायचे आहे ते ई गोल्ड किवा ईटीएफचा
पर्याय निवडू शकतात.
चंद्रशेखर पटवर्धन
9881103910

Leave a Comment