जनरल मोटर्सची नवीन तवेरा लाँच

मुंबई, दि. २२ – जनरल मोटर्सने उत्सर्जनांच्या नियमांचे पालन करणारी नवीन तवेरा निओ ३, नुकतीच बाजारात आणली. भारत स्टेज – ४ चे उत्सर्जन नियम लक्षात घेवून ही तवेरा तयार करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारत -स्टेज – ४ नियम लागू असणार्‍या १३ शहरांमध्ये ही तवेरा विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष लोवेल पॅडॉक यांनी सांगितले.
  या तवेराची किमत ७.५१ लाख ते १०.३४ लाखांच्या दरम्यान असेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जरनल मोटर्सचे भारतातील उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी चालू वर्षामध्ये २५ हजार तवेरांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी २१ हजार तवेरा कारची विक्री झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment