
पंढरपूर, दि.२२ – गुढी पाडव्यापासून हिंदूंच्या नवीन वर्षास सुरूवात होते. नववर्षानिमित्त श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम केले जातात. सकाळी मंदिरावर नवीन ध्वज लावले जातात. या दिवसापासून श्रीविठ्ठल-रूक्मिणीच्या चंदन उटी पूजेस प्रारंभ होतो.
नवीन वर्षानिमित्त श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरावरील सर्व ध्वज बदलण्यात येतात. श्रीविठ्ठल-रूक्मिणीचे नित्योपचार झाल्यानंतर श्रीविठ्ठल-रूक्मिणीस साखरेचा हार घातला जातो. दुपारी ४ वाजता श्रीविठ्ठल-रूक्मिणीस चंदन उटी पूजा केली जाते. त्यानंतर श्रीविठ्ठल-रूक्मिणीस सोन्याचे अलंकार घातले जातात. नवीन वर्षानिमित्त मंदिरामध्ये सजावट केली जाते. नवीन वर्ष आनंदात जावे म्हणून अनेक भाविक श्रीविठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
