न्यूयॉर्क, दि. २१ – पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलली नाहीत तर अफगाण-पाक सीमारेषेवर अधिक अफगाण सुरक्षा दल तैनात करावे लागेल असे अमेरिकेच्या उच्च सेनापतीने सांगितले.
दहशतवादी पाकिस्तानात आश्रय घेतात कारण तेथे त्यांना सुरक्षितता मिळते. परंतु पाकिस्तानने याबाबत लवकर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर अफगाण-पाक सीमेवर आपल्याला अफगाण सुरक्षादल अधिक प्रमाणात तैनात करावे लागेल, असे अफगाणिस्तानमधील अमेरिकन आणि नाटो दलाचे सेनापती जॉन अलेन यांनी अमेरिकन कायदेपंडितांना मंगळवारी सांगितले.
