बिजींग, दि. २०- चीनमध्ये पेट्रोलच्या दरात ६ टक्क्यांनी तर डिझेलच्या दरात ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने या वर्षात दुसर्यांदा पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
चीनला मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पदार्थांचा पुरवठा करणार्या इराणमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे जगात सर्वत्र पेट्रोल आणि डिझलचे भाव वाढले आहेत. देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा वाढावा आणि देशातील तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी भाववाढ करण्याचा निर्णय चीनी सरकारने घेतला आहे.
या दरवाढीमुळे चलनवाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चीनी सरकारने अनुदान जाहीर केले आहे. तरीही किमतीवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला अपयश येत आहे.