चिमणी प्रेमींना १२५ घरट्यांचे वाटप

नागपूर, दि. २० – जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने आज नागपुरात चिमणी प्रेमींना इंडियन सोसायटी फॉर अॅनिमल ह्यूमन वेलफेयर (आयसॉ)तर्फे १२५ घरट्यांचे वाटप करण्यात आले. आपल्या महानगरातून चिऊताई भुर्रऽऽ होवू नये या करिता अमृत भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही! अशी चिऊताईला हाक देत कवी कुसुमाग्रज तिला जागे करायचे. आता चिऊताई महानगरातून भुर्रऽऽ झाली आहे. तिला परत बोलविण्यासाठी चिमणी प्रेमीना चिमण्यांच्या घरट्याचे वाटप करण्यात आले.
  रिसायकल पाईन लाकडापासून चिमण्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करून विविध प्रकारची सुंदर घरटी आणि फिडर्स करण्यात आली. चिमण्यांना पाण्यात मनसोक्त डुंबण्यासाठी मातीची भांडी तयार करण्यात आली होती. ही भांडी चिमणी प्रेमींना देण्यात आली. मनोज तत्ववादी, राधिका जोशी, कानिटकर यांच्या हस्ते आय लव्ह स्पैरो या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात चिमण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment