ओसामाने मरण्यापूर्वी ओबामाला मारण्याचा कट रचला होता

वॉशिग्टन, दि. १७- अलकयदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व कुख्यात दहशतवादी ओसामा-बिन-लादेन याने आपल्या शेवटच्या दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ठार मारण्याचा व अमेरिकाच्या धरतीवर आणखी एक विध्वसंक हल्ला करण्याचा कट रचला होता, असे शनिवारी माध्यमांद्वारे सांगण्यात आले आहे.
  अबोटाबादमध्ये लादेनच्या घरात सापडलेल्या संगणकातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. लादेन आपल्या सहकार्‍यांना मेमो पाठवून अमेरिकेवर हल्ला करण्यासंदर्भात चर्चा करत असे. ओसामाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व अफगाणिस्तानमधील नाटो सेनेचे तत्कालीन जनरल डेविड पेन्टहौस यांना ठार मारण्याची योजना आखली होती, असे सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक पीटर बर्गन यांनी लिहले आहे.    
  ओबामांना ठार मारल्यावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळावी लागेल. अचानक झालेल्या या घटनेमुळे ते आपल्या कामासाठी पूर्णपणे तयार असणार नाहीत असा ओसामाचा अंदाज होता असे बर्गन यांनी लिहले आहे. ऑक्टोबर २०१० साली ओसामाने त्याच्या सहकार्‍याला ४८ पानांचा मेमो लिहला होता. त्यात अशा प्रकारची योजना तयार केली गेली होती, असा दावा त्यांनी  केला आहे. अमेरिकेच्या नेव्ही सीलच्या जवानांनी ओसामाला २ मे २०११ रोजी अबोटाबाद येथील त्याच्या घरात घसून ठार मारले होते.

Leave a Comment