इस्त्रायली राजदूताच्या कारस्फोटामध्ये इराणी नागरिकांचा हात – दिल्ली पोलिस

नवी दिल्ली, दि. १५ मार्च- नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाच्या कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात इराणचा सहभाग असल्याचे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी जाहीर केले. सदर हल्ल्यात सहभाग असलेल्या तीन इराणी नागरिकांची ओळख पटली असल्याचे दिल्ली पोलिसांनी यावेळी सांगितले. न्यायालयाने त्यांच्या विरुध्द अजामिन वॉरंट जाहीर केले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला भारतीय पत्रकार सय्यद मोहम्मद अहमद कझमी याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे संशय व्यत्त* केला जात आहे. त्याला ६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी तृणमुल काँग्रेस पक्षाचे सूलतान अहमद यांच्या नेतृत्वाखाली काही खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन सय्यदला सोडण्याची मागणी केली होती. मात्र सय्यद यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची गैरवर्तवणुक होणार नाही व कायदेशी प्रक्रियेतून सर्व बाबी पार पडतील, असे पंतप्रधानांनी त्यांना यावेळी सांगितले होते. दरम्यान, सोमवारी इस्त्रायलचे राष्ट*ीय सूरक्षा सल्लागार याको अॅमिड*ोर यांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती.

Leave a Comment