अखिलेश यादव उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान

लखनौ, दि.१५ मार्च-  समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी गुरुवारी उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. अखिलेश हे उत्तर प्रदेशाच्या इतिहासातीस सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. उत्तरप्रदेशाचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी अखिलेशला पदाची व गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिह बादल, उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेत्री जया बच्चन यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते. अखिलेश यांच्यासोबत इतर २९ आमदारांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. यांच्यात राजाभैया यांनाही अखिलेशने आपल्या मंत्रीमंडळात सहभागी केले. हा सोहळा लखनौतील मार्टिनीयर मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे २५ हजार लोकांनी उपस्थिती दर्शविली. या समारंभासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांपैकी २२४ जागांवर विजयी होऊन स्पष्ट बहूमत मिळविले. आता त्यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी अखिलेश यांच्याकडे आहे. सपाने बारावी पास विद्यार्थ्यांना लॅपटॉप, दहावी पास विद्यार्थ्यांना टॅबलेट, पदवीधर बेरोजगारांना प्रतिमहिना एक हजार रुपये भत्ता, मोफत उपचार, शेतकर्‍यांची कर्जमुत्त*ी यासारख्या घोषणा केल्या होत्या.

आपण सर्वप्रथम उत्तरप्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देऊ, असे अखिलेशने यापूर्वी स्पष्ट केले होते. तसेच राज्यातील जनतेला एक चांगले सरकार देण्याचे प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त तरुणांचा समोवेश दिसून येत आहे. मात्र त्यांनी अनुभवी आमदारांनी मंत्रीपद भूषविण्याची संधी दिली आहे.

Leave a Comment