भोपाळ, दि. १५ – मध्यप्रदेश राज्यात कठोर लोकायुक्त कायदा बनविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकार्यांना आंमत्रण दिले आहे. राज्यात एक सक्षम लोकपाल कायदा आणण्यासाठी मुख्यमंत्री व अण्णांचे सहकारी काम करतील, असे टीम अण्णांकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्यात शुक्रवारी यासंदर्भात बैठक होणार आहे. तसेच राज्यात होत असलेल्या बेकायदेशी खाणकाम प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही टीम अण्णाने केली आहे.
उत्तराखंड राज्याने लागू केलेल्या सक्षम लोकपालाप्रमाणे मध्यप्रदेशात कायदा लागू करण्याची मागणी टीम अण्णांचे सदस्य शरदसिंह कुम्रे यांनी केल्यानंतर त्यांना चर्चेसाठी चौहानांकडून आमंत्रण आले. कुम्रे यांच्यासह टीम अण्णाचे सदस्य विपिन कोठारी राज्यात सक्षम लोकपाल आणण्यासाठी तीन दिवसांच्या उपोषणावर बसले होते. ते १३ मार्च रोजी उपोषणावर बसले होते. व बुधवारी रात्री त्यांना शिवराज सिह चौहान यांनी चर्चा करण्यासाठी आमंत्रण धाडल्यानंतर त्यांनी आपले उपोषण सोडले असल्याचे समजते.