सरकारी कर्मचार्‍यांना ६ वा वेतन आयोग लागू

विजापूर, दि. १४ मार्च – कर्नाटक राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन ६ व्या आयोगानुसार वाढविण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने सुबीर हरिसिंग यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने आपल्या शिफारशी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना सादर केल्या आहेत.
या शिफारशीनुसार मूळ वेतनमध्ये ४८०० रुपयांपासून ९६०० रुपयांपर्यंत वेतनवाढ करण्यात येणार आहे. शहरभत्ता ३०० रुपयांवरुन ६०० पर्यंत वाढविण्यात येणार. या पुढे दैनिक भत्ता पध्द्त रद्द करण्यात येणार आहे. हा भत्ता मूळ वेतनातच समाविष्ट करण्यात येईल. तसेच मूळ वेतनात २५ टक्के घरभाडे विलीन करण्यात येणार आहे. या शिफारशी जानेवारी २०१२ पासून लागू करण्यात येतील.
या पुढे आठवडयातील ६ दिवसांऐवजी ५ दिवस सरकारी सेवकांना काम करावे लागेल. महिलांना बाळंतपणासाठी ६ महिन्यांची पगारी रजा मिळेल. सरकारी सेवकांना हेल्थ कार्ड देण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

Leave a Comment