सिरियावरुन अमेरिका व रशियामध्ये मतभेद

वॉशिंग्टन, दि. १३ – सिरियाच्या मुद्यावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका व रशियामध्ये प्रचंड मतभेद झाले आहेत. सिरियामध्ये झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी ठरविण्याबाबत तसेच बशर-अल-असद यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतलेल्या भूमिकेवरून अमेरिका आणि रशियाने परस्परविरोधी मते व्यक्त केली आहेत.
अमेरिका स्वातंत्र्य व शांततेचा पुरस्कार करते. मात्र जेव्हा एखाद्या देशाचे सरकार स्वतःच्या देशातील नागरिकांचीच हत्या करीत असेल, तर तेथील क्षेत्रिय शांतता आणि सुरक्षेपुढे आव्हान निर्माण होते. त्यामुळे अमेरिका अशा सरकारला पाठींबा देणार नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन यांनी येथे सांगितले. सिरियात हिंसाचार झाला तर त्याला आळा घालण्याची पहिली जबाबदारी तेथील सरकारची आहे. मात्र त्यांनी त्यावर तत्काळ कारवाई केली नाही, असे क्लिंटन म्हणाल्या.
सिरियातील हिंसाचाराला अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांसह तेथील बंडखोर जबाबदार आहेत. या दरम्यान तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिरियातील सरकारवर मोठी जबाबदारी होती, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सेरगे लावरो यांनी येथे सांगितले.

Leave a Comment