बांग्ला देशात जहाज बुडाले; दीडशे प्रवासी बेपत्ता

ढाका, दि. १३ – मध्य बांग्लादेशमधील एका नदीमध्ये तेलवाहू जहाजाशी टक्कर झाल्यामुळे ३०० प्रवासी असलेले जहाज पाण्यात बुडाले. या अपघातानंतर अपघातग्रस्त जहाजावरील सुमारे १५० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या जहाजावर असलेल्या लाईफ बोटींच्या सहाय्याने सुमारे पन्नास प्रवाशांनी आपला जीव बचावला असला तरी उर्वरीत प्रवाशांचा शोध अद्याप सुरू आहे.
मुशींगझ परिसरातील मेघना नदीत सदर प्रवासी जहाज व एका तेलवाहू टँकरला ठोकल्यामुळे ही दुर्घटना घडली. एम. व्ही. शर्यतपूर-१ हे जहाज पश्चिम शर्यतपूर येथून ढाकाच्या सदारघाट टर्मिनलकडे येत होते. तेव्हा पहाटेच्या सुमारास या जहाजाची तेलवाहू टँकरशी टक्कर झाली, असे संबंधित अधिकारी व प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बेपत्ता झालेल्यांपैकी तीन जण अमेरिकन नागरिक आहेत.

Leave a Comment