देशरक्षणासाठी भारतीय सेना सिद्ध आहे काय?

नागपूर, दि. १३ कारगील युद्धात पाकिस्तानी सेनेला सडेतोड आणि तडाखेबंद उत्तर देत भारतीय लष्कराने जोरदार विजय प्राप्त केला. या युद्धात भारतीय सेना आपल्या रक्षणासाठी स्वयंसिद्ध आहे काय, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता.
याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कारगिल युद्धातील तीन नायक नागपुरात हितवादच्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत. बुधवारी, १४ मार्च रोजी सायंकाळी हितवादच्या शतकमहोत्सवाच्या समारोप प्रसंगाचे औचित्य साधून भारत स्वसंरक्षणासाठी कितपत सिद्ध? या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलेले आहे.
कारगील युद्धादरम्यान भारतीय लष्कराचे नेतृत्व करणारे जनरल वेदप्रकाश मलिक, तत्कालीन वायुदल प्रमुख एअर चीफमार्शल अनिल  टिपणीस आणि तत्कालीन नौदलप्रमुख अॅडमिरल सुशीलकुमार हे तिन्ही सेनानायक भारताच्या संरक्षणसिद्धतेवरील आपले विचार व्यक्त करतील. तिन्ही सैन्यदलाचे माजी प्रमुख एकत्र येण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे सेनादलाचे बॅण्डपथक असणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, उपस्थित राहण्याचे आवाहन प्रबंध संपादक बनवारीलाल पुरोहित यांनी केले आहे.

Leave a Comment