अंधश्रध्दा निर्मूलन विधेयक अधिवेशनात मांडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. १३ – महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संतांनी समाजातील अधर्म, अंधश्रध्दांवर प्रहार करतानाच धर्म, श्रद्धा वाढविण्याचे कार्य तितक्याच जोमाने केले. मात्र काही नास्तिकवादी संघटना आणि धर्मविरोधक हिंदू समाजाने केलेले कोणतेही धार्मिक कृत्य म्हणजे अंधश्रध्दा आहे, असा प्रचार करून, विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
सरकारने हे विधेयक सदनासमोर ठेवून ते पारित करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे. २० मार्च रोजी या विधेयकाविरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले जाणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment