
श्रीनगर, दि. १२ मार्च – काश्मीर खोर्याला सोमवारी सकाळी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सकाळी ११.३६ वाजता वायव्य काश्मीर भागात जाणवला असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी मोजण्यात आली आहे, असे येथील व्यवस्थापन अधिकार्याने सांगितले. या भूकंपाचा कंद्र बिदू पाकिस्तान नियंत्रित गिलगिट येथे होता. या भूकंपात कोणतीही जिवित अथवा वित्त हानी झालेली नाही, असे अधिकारी म्हणाले.