बस उलटून प. बंगालात ७ ठार, ७० जखमी

   बुर्दवान, दि.१० – बुर्दवान जिल्हयातील औसग्राम येथे शनिवारी पहाटे बस उलटल्यामुळे झालेल्या अपघातात सात जण ठार तर ७० जण जखमी झाले आहेत.  अपघातग्रस्त बस बुर्दवान जिल्हयातील कोलकोल गावातील वर्‍हाडाला घेवून बीरपारा येथे जात होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास  चालकाचे भरधाव वेगात असणार्‍या बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला, असे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
  जखमींपैकी काहींना बुर्दवान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात तर इतरांना औसग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सहा जणांची स्थिती अतिशय गंभीर आहे.

Leave a Comment