नशिक, दि. १० – नाशिक मनपात महापौर व उपमहापौर या पदासाठीची निवडणुक पुढील आठवड्यात होणार आहे. त्या पदासांठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी महापौर पदासाठी एकुण ११ नगर सेवकांनी १८ अर्ज तर उपमहापौर पदासाठी ९ नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत.
नाशिकला मनसे भाजपा चा घरोबा होणार व त्या साठी सेना सहाय्य करणार असे निश्चित असले तरी राजकीय घडामोडी नेमक्या वेळेवर काय चमत्कार करतील हे सांगता येणे कठिण असल्यानेच कि काय अपक्षांसह विविध पक्षांच्या नगरसेवकानी या दोन्ही पदासाठी अर्ज केले आहे.
अर्ज दाखल करणार्यात महापौर पदासाठी शशिकांत जाधव, यतीन वाघ, अशोक मुर्तडक, तानाजी जायभावे, शिवाजी चुंभळे, कविता कर्डक , शिवाजी सहाणे, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, शाहु खैरे यांचा समावेश असून संजय चव्हाण, गुरुमित बग्गा या अपक्ष नगरसेवकांनी व माकपाचे तानाजी जायभावे यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी रमेश धोंगडे, वत्सला खैरे, शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील, सतीश कुलकर्णी यांनी अर्ज केले आहेत.
नाशिक महानगर पालिका निवडणुकांनतर कोणत्याही एका पक्षास बहुमत नसल्याने आता महापौर कोण असा प्रश्न नाशिककरांसमोर होता,त्याचे उत्तर पुढील आठवडयात राजकीय चुरस वाढून निश्चितपणे मिळणार आहे.
