राष्ट्रीय पुरस्कारात मराठी चित्रपटाचा वरचष्मा

नवी दिल्ली, दि. ०८ मार्च – २०१२ राष्ट्रीय पुरस्कारची घोषणा राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आली. या पुरस्कारात बाजी मारली ते मराठी चित्रपटांनी. ‘देऊळ‘, ‘शाळा‘ आणि ‘बालगंधर्व‘ या तीन मराठी चित्रपटांनी तब्बल आठ पुरस्कार पटकवत मराठीचा झेंडा डौलाने फडकवला आहे. तसेच ‘देऊळ‘ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि याच चित्रपटातील गिरीष कुलकर्णी यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता‘ तर ‘बुंबाट‘ विद्या बालनला ‘दी डर्टी पिक्चर‘साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावजण्यात आले.

२०१२ च्या राष्ट्रीय पुरस्कारात मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपटचीच दादागिरी होती. ‘उमेश कुलकर्णी‘ दिग्दर्शीत ‘देऊळ‘ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता गिरीष कुलकर्णी याला ‘देऊळ’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे पुरस्कार मिळाले आहेत. मिलिद बोकील यांच्या कांदबरीवर आधरीत असलेला ‘शाळा‘ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तसेच सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार ‘शाळा’ या चित्रपटासाठी अविनाश देशपांडे यांना मिळाला. तसेच नव्या युगाचा विश्वकर्मा नितीन देसाईच्या ‘बालगंधर्व‘ या चित्रपटाला तीन पुरस्काराने गौरवण्यात आले. आंनद भाट यांना पार्श्वगायनासाठी, विक्रम गायकवाड यंाना रंगभूषेचा पुरस्कार तर नीता लुल्ला यांना वेशभूषेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  

सामाजिक जीवनावर आधारीत असलेला ओनीर यांचा आय एम सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा ठरला आहे. विद्या बालनला ‘दी डर्टी पिक्चर‘साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट गायिका रुपा गांगुली यांना नावजण्यात आले. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट  सलमान खानचा चिल्लर पार्टी हा तर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार स्टॅनली का डब्बा या चित्रपटातील पार्थे गुप्ते याने पटकावला. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक जिदंगी ना मिलेगी दोबारा यातील सेनोरीटा गाण्यासाठी बास्को सीझर याला मिळाला. सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट कन्नडमधील प्यारी या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिस वर सपशेल आपटलेला शाहरुखचा ‘रा.वन’ या सिनेमाला बेस्ट स्पेशल इफेक्टसाठी गौरवण्यात आले. एकूण मराठी चित्रपटाचे यश पाहता ‘अब ऑस्कर दूर नाही‘ असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.

    

Leave a Comment