राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न

मुंबई, दि. ५ मार्च- राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या ३० मार्च रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. येत्या १२ ते १९ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया तयार करण्यात येणार असून आघाडीचे चार तर युतीचे दोन सदस्य सहजपणे विजयी होतील असे संख्याबळ दोन्ही बाजूला नाही. आघाडीला एका जागेसाठी मनसे आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
काँग्रेसचे विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, राष्ट*वादीचे गोविदराव आदिक, रणजितसिह मोहिते-पाटील यांच्या जागा रिक्त होत आहेत. रणजितसिह यांच्या एवेजी त्यांचे वडील विजयसिह मोहिते-पाटील यांना यावेळी राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.
शिवसेनेचे मनोहर जोशी यांना बदलून रिपाईचे रामदास आठवले किवा स्मिता ठाकरे यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. मनोहर जोशी यांना येत्या जुलै महिन्यात युतीकडून उपराष्ट*पतीपदाचे उमेदवार म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी नव्या माणसाचा विचार केला जात आहे. भाजपचे बाळ आपटे यांना बदलून उद्योगपती अजय संचेती किवा राजेश शहा यांची वर्णी लागू शकते. मात्र, संघ परिवरातील व्यक्ती देण्याचा आग्रह होत असल्याने राजाभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्यानावाचा विचार होऊ शकतो.
काँग्रेस – राष्ट*वादीकडे अपक्षांसह १७० चे संख्याबळ आहे. ४२ मतांच्या तुलनेत चार खासदारांसाठी त्यांना १६८ मते पाहिजे आहेत. तर युतीकडे त्यांचा उमेदवार विजयी करुन दहा मते शिल्लक राहतात. शेकापची चार, मनसे १२ आणि अन्य मतांच्या रस्सीखेचीत सातवा अपी उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न युती करणार का ? यावर अद्याप वादंग आहे. उद्योगपती संजीव काकडे यांच्या उमेदवारीच्या बातम्या येत असून याबाबत अद्याप युतीत संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यसभेत उघडपणे मतदान होते. तेथे आमदारांना विरुध्द मतदान करण्याची शक्यता फार कमी असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे आघाडी आणि युतीचा प्रयत्न राहिल.

Leave a Comment