मराठी चित्रपटात काम करायला आवडेल – विद्या बालन

पुणे, दि. ०६ मार्च – मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आले असून सध्या मराठीत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. अनेक हिदीमधील कलाकार मराठीत काम करीत आहेत. मराठी चित्रपटात काम करण्याचे संधी मिळली तर मराठीत काम करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री विद्या बालन हिने दिली आहे.

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘कहाणी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या पुण्यात आली होती, यावेळी तिने पत्रकारंशी संवाद साधला. सध्या मराठीत अनेक हिदी चित्रपटातील कलाकार काम करीत आहेत. आपण अनेक वर्षांपासूनमहाराष्ट्रात   असून आपल्याला उत्तम मराठी येते. आपण नटरंग, शिक्षणाच्या आईचा घो, हरीश्चंद्राची फॅक्टरी असे अनेक मराठी चित्रपट पाहिले आहेत. तसेच मराठीतील लावणी हा प्रसिद्ध मादकनृत्य प्रकार आपल्याला खूप आवडतो. यामुळे जर आपल्याला मराठीतून विचारणा झाली तर नक्कीच मराठी चित्रपट करायला आवडेल, असे तिने यावेळी सांगितले.

कहाणी चित्रपटाबाबत बोलताना ती म्हणाली, एक गरोदर महिला आणि कर्तव्यदक्ष बायकोची ही एक नव्या धाटणीची भूमिका आहे. ही भूमिका साकारताना स्त्रीरोगतज्ञ आणि आजी यांच्याशी चर्चा करून गरोदरपणाची अवस्था आणि बंधने जाणून घेतली. तसेच पोटावर कृत्रीम पोट बांधून त्या अवस्थेत चालण्याचा वागण्याचा सराव केला. त्या कृत्रीम पोटाचे वजन जास्त असल्याने आपोआप भूमिका साकारताना त्याची मदत झाली. 

चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांबाबत बोलताना ती म्हणाली, नशिबाने आपल्याला चांगल्या दिगदर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका साकारण्यात यश आले. काही न विचार करता खुप मोठे यश आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे चांगला दिगदर्शक असल्यास भूमिका स्विकारताना फारसा कोणताही विचार करत नाही. मात्र, भुमिका स्विकारल्यावर प्रयत्नपुर्वक त्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. 

चित्रपटसृष्टीतील स्त्री केंद्री चित्रपटांची स्थिती ? या प्रश्नाला उत्तर देताना विद्या म्हणाली, स्त्री केंद्री चित्रपटांची संख्या खुपच कमी आहे. चित्रपटसृष्टीत महिलांकडे फक्त मादक अदाकरी म्हणूनच पाहिले जाते. त्याचेच वेगवेगळे प्रकार तुम्हाला पडद्यावर पहायला मिळतात. मादकता हे स्त्रीचे बलस्थान असून त्या दृष्टीकोनातून भुमिका साकरण्यात काही चुकीचे नाही. अभिनेत्री या गुणांचा योग्य वापर करून घेतात. डर्टी सुद्धा त्याचाच एक भाग आहे, असे तिने सांगितले.

Leave a Comment