करुणानिधांच्या सुरक्षा रक्षकांच्या निवास्थानांवर छापे

चेन्नई, दि. २ : भ्रष्टाचारविरोधी पथकाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या तीन सुरक्षा अधिकार्‍यांच्या निवास्थानावर शुक्रवारी छापे टाकले. बेहिशेबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पॅन्डीयन, गॅनसन आणि विनोथ्थान या अधिकार्‍यांच्या परिसरात छापे टाकून मालमत्तेची कसून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जमीन घोटाळे व बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याप्रकरणी द्रमुकचे काही माजी मंत्री व आमदारांच्या निवास्थान व कार्यालयांवर याप्रकारचे छापे टाकून पोलिस कारवाई करण्यात आली होती. गेल्या एप्रिलमध्ये जयललितांच्या एआयएडीएमके पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांच्या घरांवर छापे टाकून पोलिस कारवाई होत आहे.
——————————————————————————–