
नवी दिल्ली-देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत आणखी भर पडली असून सोन्याच्या वाढत्या किमंतीने भारत सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि स्थानिक बाजारात सोन्याच्या किमतीला तेजी आल्याने सरकारच्या तिजोरीत ठेवलेल्या सोन्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे, असे आयबीने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारला फायदा होत आहे. तसेच आंतरराष्ट*ीय नाणे निधीकडून भारत सरकारने खरेदी केलेल्या २०० टन सोनेच्या किमतीत वाढ झाली आहे, असा अहवाल आयबीचे प्रमुख नेहचल सिधू यांनी पंतप्रधान मनमोहन सिह यांना दिला आहे.नोव्हेंबर २००९ मध्ये भारत सरकारने आयएमएफकडून १०४५ डॉलर प्रति औंस दराने २०० टन सोने खरेदी केले होते. त्यावेळी त्याची किमत सात अब्ज डॉलरच्या आसपास होती. आता सोन्याचा भाव १७८१ डॉलर प्रति औंस पोहचला आहे. साल १९९१ मध्ये भारताकडे जेव्हा आयातीसाठी पैसे नव्हते तेव्हा सरकारने ६७ टन सोने गहाण ठेवले होते. त्यातील ४७ टक्के सोन बँक ऑफ इंग्लंड तर २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झरलँडमध्ये गहाण होते. त्यावेळी भारताकडे फत्त* तीन आठवडे पुरेल एवढेच विदेशी चलन होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून भारत सरकारकडे सुमारे ५५८ टन सोने आहे.