‘द आर्टिस्ट’ चित्रपटाला सर्व मुख्य ऑस्कर पुरस्कार

लॉस अंजलीस -८४ व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘द आर्टिस्ट’ आणि ‘ह्युगो’ या चित्रपटांनी प्रत्येकी पाच पुरस्कार जिंकून वर्चस्व मिळविले.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, संगीत, चित्रपट अशा विविध विभागात ‘द आर्टिस्ट’ या चित्रपटाने मुख्य पुरस्कार मिळविले. तर ‘ह्युगो’ या चित्रपटानेही पाच पुरस्कार मिळविले. या चित्रपटाने तांत्रिक पुरस्कारांमध्ये वर्चस्व मिळविले. सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेजचा पुरस्कार इराणच्या ‘अ सेपरेशन’ या चित्रपटाने मिळविला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मेरील स्ट्रीपने ‘द आयर्न लेडी’ चित्रपटासाठी पटकावला.

पुरस्कार पुढीलप्रमाणे –
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – मिकेल हझानावेसियस – ‘द आर्टिस्ट’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जेन ज्युआर्डीन – ‘द आर्टिस्ट’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मेर्ल स्ट्रीप – ‘द आयर्न लेडी’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘द आर्टिस्ट’
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ऑक्टेव्हिया स्पेन्सर – ‘द हेल्प’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ख्रिस्तोपर प्लुमर्स – ‘बिगिनर्स’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट संगीत – लुडोविक बोर्स – ‘द आर्टिस्ट’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग – ब्रेट मॅकेंझी – ‘द मपेट्स’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी – रॉबर्ट रिचर्डसन – ह्युगो चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – ‘ह्युगो’
सर्वोत्कृष्ट ध्वनीमिश्रण – टॉम फ्लेईश्चमन आणि जॉन मिडग्ले – ‘ह्युगो’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संपादन – फिलिप स्टॉकटोन आणि युजेन गिअर्टी – ‘ह्युगो’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट संपादन – किर्क बॅक्स्टर आणि एँगुस वॉल – ‘द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मार्क ब्रिजेस – ‘द आर्टिस्ट’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट मेकअप – मार्क कौलियर आणि जे रॉय हेलँड – ‘द आयर्न लेडी’ चित्रपटासाठी
बेस्ट फॉरेन लँग्वेज चित्रपट – इराणच्या ‘अ सेपरेशन’ चित्रपटाला पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर चित्रपट – रँगो
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर – टी जे मार्टीन, डॅन लिंडसे आणि रिच मिडलमास – ‘अनडिफिटेड’
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टस – ‘ह्युगो’
सर्वोत्कृष्ट ऍडप्टेड स्क्रिनप्ले – अलेक्झांडर पेन, नॅट फॅक्सन आणि जीम रॅश – ‘द डिसेंडन्टस’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले – वुडी ऍलन – ‘मिडनाईट इन पॅरिस’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – सेव्हिंग फेस

Leave a Comment