संत साहित्यावरील चर्चेने मराठी भाषा समृध्द होईल – मुख्यमंत्री

नाशिक, दि.२५ फेब्रुवारी – विविध कार्यशाळा, संमेलने, परिसंवाद, चर्चासत्राच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करणारा एक वर्ग असून दुसरीकडे कीर्तन, भारुड या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारा आणखी एक वर्ग आहे. या दोघांत विचारमंथन होणे गरजेचे आहे. संत साहित्याच्या विविध पैलूंवर चर्चा होऊन मराठी भाषा अधिक समृध्द होऊ शकते, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने येथे आयोजित उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळयास संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, आदिवासी विकास मंत्री बबन पाचपुते, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, विठ्ठल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  

मराठी भाषा जडणघडणीत संत साहित्याचा महत्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे त्याचा विसर पडणे परवडणारे नाही. वारकरी व राजकारण्यांची देण्याची पंरपरा असून त्यामुळे वारकर्यांरना जर राजाश्रय लाभला तर अधिक चांगल्या पध्दतीने समाजप्रबोधन करता येईल, असेही चव्हाण यांनी नमूद केले. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी शासनही प्रयत्न करीत आहे. वारकर्यांूसाठी ज्ञानोबा तुकाराम हे जाहीर केलेले पुरस्कार त्याचाच एक भाग आहे. तीर्थक्षेत्राच्या विकास करण्याकडेही लक्ष देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राज्यात वैचारिक व धार्मिक अशा असणार्या  दोन पंरपरांमध्ये संवाद घडविण्यासाठी वारकरी संप्रदाय हे महत्वपूर्ण माध्यम असल्याचे सांगितले. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवासापासून संत साहित्याला तोडता येणार नाही. संत साहित्य हे सर्वसमावेशक असून त्याला डावलता येणार नाही. 

मराठी साहित्याचा संत साहित्य हा केंद्रबिदू आहे. सामाजिक मूल्ये व जगण्याची सूत्रे देणारे हे साहित्य असल्याचे ते म्हणाले. संमेलनातील राजकीय हस्तक्षेपाबाबत त्यांनी संमेलनात राजकीय मंडळींकडून आम्हाला काही नको असल्याचे स्पष्ट करत उलट त्यांना देण्यासाठी आम्ही हे संमेलन भरविल्याचे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांनी वारकर्यांमनी सर्व मतभेद विसरुन एकोप्याने रहावे, असे आवाहन केले. वारकर्यां्च्या समस्या सोडविण्यासाठी शासन बांधील असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाचपुते यांनी वारकर्यांमना संकटीत होण्याचे आवाहन केले. पंढरीच्या वारीसाठी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संमेलनानिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Leave a Comment