
नाशिक, दि.२५ फेब्रुवारी – विविध कार्यशाळा, संमेलने, परिसंवाद, चर्चासत्राच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करणारा एक वर्ग असून दुसरीकडे कीर्तन, भारुड या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारा आणखी एक वर्ग आहे. या दोघांत विचारमंथन होणे गरजेचे आहे. संत साहित्याच्या विविध पैलूंवर चर्चा होऊन मराठी भाषा अधिक समृध्द होऊ शकते, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने येथे आयोजित उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळयास संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, आदिवासी विकास मंत्री बबन पाचपुते, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, विठ्ठल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.