दक्षिण आफ्रिकेने टाकली सामना आणि मालिका खिशात

ऑकलँड, दि.२२फेब्रुवारी- दक्षिण आफिका वि. न्यूझीलंडमधील तिसरा आणि शेवटचा झटपट क्रिकेट सामना आज ऑकलँड येथे पार पडला. याही सामन्यावर गेल्या सामन्याप्रमाणेच आफिकन खेळाडूंचेच वर्चस्व होते. चोकर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या आफ्रिकन संघाने आज हा डाग मिटवत सामना व मालिका आपल्या खिशात टाकली.

किवी संघाने नाणेफेक जिकून दक्षिण आफिकेला फलंदाजीस आमंत्रित केले. गेल्या सामन्यातील व झटपट क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकवीर आर. लेवी आणि आमला याने डावाला सुरवात केली. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारुन दिली नाही. किवींच्या अचूक मार्‍यापुढे आफ्रिकन संघाला २० षटकात ७ बाद १६५ पर्यंतच मजल मारता आली. आफिकेकडून जे. डयुमीनी ३८ व अमलाने ३३ सर्वाधीक धावा केल्या. न्यूझीलंडकडून टी. साऊथी याने ५.५० च्या कजुंस रेटने गोंलदाजी करीत ४ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.

मालिका विजयाच्या ईर्षेने उतरलेल्या किवी संघाने आफ्रिकन गोलंदाजास चोख प्रत्युत्तर दिले. पॅावर प्लेचा पुरेपूर उपयोग घेत न्यूझीलंडने ६ षटकात १ बाद ६५ अशी मजल मारली. सामना आणि मालिका यजमान संघ खिशात घालतोय असे वाट असताना आफ्रिकन गोलंदाजानी सामन्यात पुनरागमन केले. शेवटच्या षटकात यजमानांना विजयासाठी ७ धावांची गरज होती. एम. डी लेन याने षटकात दोन गडी बाद करुन पूर्ण स्टेडीअम सुन्न केले आणि सामना अन् मालिका खिशात घातली. किवींकडून रायडरने सर्वोच्च ५२ धावा केल्या. योग्य वेळी सामन्यास कलाटणी देणारा आफिकेचा फिरकीपटू जोहान बोथा हा सामनवीराचा मानकरी ठरला. त्याने ४ षटकात २० धावा देत २ बळी मिळवले.

Leave a Comment