
काँग्रेस पक्षाची मुंबईवर खास मेहेरनजर आहे.या पक्षाने मुंबई शहर काँग्रेसवर वेगळी कृपा करून या शहर शाखेला मुंबई प्रदेश काँग्रेस असा दर्जा बहाल केला आहे.देशातल्या अन्य कोणत्याही शहरातल्या शाखेला असा दर्जा दिलेला नाही. काँग्रेसच्या नेत्यांसाठी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. देशभरात जमा होणार्या आयकरापैकी ४५ टक्के आयकर एकट्या मुंबईत जमा होतो. पक्षाचा निधी गोळा करायला यापेक्षा चांगले ठिकाण कोणते असेल ? म्हणूनच अनेक नेते मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होण्यासाठी जीव टाकत असतात. एकदा हे पद मिळाले की त्यांची अवस्था पाँचो उंगलिया घी मे, अशी होते. पक्षश्रेष्ठींकडे अब्जावधींचा निधी पाठवता पाठवता त्यातला काही माल गपापा केला तरी काही वर्षात कोट्यधीश होता येते. म्हणून १९७० साली उत्तर प्रदेशातून मुंबईत येणारा कृपाशंकर सिग यांच्यासारखा माणूस १९७० साली ढकलगाडीवर कांदे विकत असतो पण एकदा मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झाला की, सर्वांना विकत घेता येईल एवढ्या बेनामी संपत्तीचा मालक होतो. असा माणूस सत्तेच्या वरच्या थरावर आपला जम बसवून राहू शकतो. भाजपात प्रमोद महाजन यांची किमत याच एका जोरावर वाढलेली होती हे विसरता येत नाही. कृपाशंकर यांचा सोनिया गांधी यांच्याशी थेट संफ आहे आणि अहंमद पटेल यांच्याशी सरळ संवाद आहे. अहंमद पटेल या माणसाचे काँग्रेसमधले आजचे स्थान मनमोहनसिग यांच्यापेक्षाही वरचे आहे. त्यामुळे अहंमद पटेल यांच्याशी जमवून घेतात ते कितीही पापे करून तरून जातात. विलासराव देशमुख यांचे केन्द्रातले स्थान अढळ असण्यामागे हेच रहस्य आहे. २००३ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदात बदल झाला. विलासराव देशमुख यांना हटवून सुशीलकुमार शिदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा या बदलाची माहिती पहिल्यांदा सोनिया गांधी, अहंमद पटेल आणि कृपाशंकर यांनाच होती. कृपाशंकर यांनी सांगितल्यानंतरच शिदे यांना आपण मुख्यमंत्री होणार आहोत हे कळले.