‘राईट टू रिजेक्ट’ भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील पुढचे पाऊल – किरण बेदी

मथुरा, दि.२२फेब्रुवारी-ईव्हीएम मशिनवर ‘राईट टू रिजेक्ट’ बटण असण्यासाठी प्रयत्न करणार असून हे भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे पुढील पाऊल असल्याचे टीम अण्णा सदस्य किरण बेदी यांनी स्पष्ट केले आहे.
मतदारास एखादा उमेदवार योग्य वाटत नसेल तर ४९-० नियमाखाली मतदान अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली मतदार १७ (ए) नोंदणी पुस्तकात त्या उमेदवाराचे नाव दाखल करू शकतो, असे त्यांनी सांगितले. यामुळे ‘राईट टू रिजेक्ट’ मान्य करण्यास सरकार आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढू शकतो.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना त्यांच्या अधिकाराबाबत जागरूक करण्यासाठी किरण बेदी आणि मनिष सिसोडीया अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत.

 

Leave a Comment