कल्याण – डोंबिवली ओबीसी, धुळे, भिवंडीत खुल्या प्रवर्गातील महिला महापौर

मुंबई,दि.२२फेब्रुवारी-राज्यातील महापालिकामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर त्या प्रमाणात महापौरपदाकरिता देखील आरक्षण असावे याकरीता राज्य सरकारने सन २०१० मध्ये सोडत काडून जाहीर केलेल्या ८ महापालिकांमध्ये नव्याने आरक्षण सोडती काढल्या आहेत. त्यानुसार आता कल्याण-डोबिवलीमध्ये मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी महापौरपद आरक्षीत झाले आहेत. तर भिवंडी आणि धुळे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव झाले आहेत.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोबिवली २०१० साली सोडत काढली होती. त्यानुसार या तीनही ठिकाणी इतर मागास प्रवर्गाचा महापौर विराजमान होणार आहे. यापैक महिलांना आरक्षणासाठी सोडत आज काढण्यात आली. त्यात कल्याण-डोबिवलीत महिला व इतर मागास प्रवर्गाची सोडत निघाली. भिवंडी, मीरा-भाईदर, नाशिक, धुळे, नांदेड या खुल्या प्रवर्गातील महापौर पदाच्या जागांपैकी महिला आरक्षणाची सोडत  निघाली त्यानुसार धुळे व भिवंडीत खुल्या प्रवर्गातील महिला महापौर विराजमान होणार आहेत.

Leave a Comment