सोनी टीव्हीवर नवीन मालिका सुरू

मुंबई,दि.२२फेब्रुवारी-सोनी टीव्ही नेहमीच आपल्या दर्शकांना खूप काही नवीन देत असतो. मुंबईतील जुहू येथे असलेल्या जे डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये बुधवारी ‘शुभविवाह’ या एका नव्या मालिकेचा आरंभ करण्यात आला. यावेळी या मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते.
या मालिकेत राकेश बेदी, नेहा जनपंडीत आणि इजाज खान हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राकेश बेदी यांनी या मालिकेत पाच मुली असलेल्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यातील एक मुलगी म्हणजेच नेहा जनपंडीत नेहा जनपंडीत हिने या मालिकेत सरोजची तर इजाज खान याने अमृतची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment