
नवी दिल्ली दि.२२फेब्रुवारी-मुंबई हल्ल्यादरम्यान हल्लेखोर दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी केलेले संभाषण सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे. महाराष्ट* सरकार आणि कसाबच्या वकिलांच्या उपस्थितीत आफताब आलम आणि न्या. सी. के. प्रसाद हे हल्ल्या दरम्यान झालेले संपूर्ण संभाषण ऐकणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने आपल्यावरील निर्णय उदारतेने द्यावा अशी याचिका कसाबने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर कसाबच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारची गदा आणली नसल्याचे सांगून महाराष्ट* सरकारने या याचिकेला विरोध केला होता. तसेच कसाबला तुरुंगात कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक दिली गेलेली नाही. त्याच्यासोबत चागंला व्यवहार करण्यात आला आहे, असे सांगून कसाबने केलेली याचिका हा एक कट असल्याचा दावा महाराष्ट* सरकारने न्यायालयात केला होता.सराकरने कसाबला कोठडीत कोणत्याही प्रकारच्या शारिरीक यातना दिलेली नाही. त्याचे घटनात्मक अधिकार पूर्णपणे जपण्यात आले आहे, असा अहवाल महाराष्ट* राज्य सरकारचे वकिल व माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांनी न्या. आफताब आलाम आणि न्या. सी. के. प्रसाद यांच्यासमोर सादर केला.मुंबई उच्च न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्याने या निर्णयाला सर्वाच्च न्यायालायात आव्हान दिले आहे. हा नरसंहार करण्यासाठी देवाच्या नावावर आपला एखाद्या रोबोर्टसारखा ब्रेन वॉश केला गेला होता. मी एक युवक असून फाशीच्या शिक्षेसाठी पात्र नाही, अशी याचिका कसाबने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.