अफगाणिस्तानातील कुराण प्रकरणाचा तपास आयएसएएफ लवकरच पूर्ण करणार

वॉशिंग्टन,दि.२२फेब्रुवारी-काबूलमध्ये मुस्लिम धार्मिक साहित्य अवैधरित्या हाताळलेल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने नेमलेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा सहायता दलाचा तपास लवकरच पूर्ण होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात हात असलेल्या व्यक्तींना लवकरच पकडण्यात येईल.
परदेशी सैन्याने मोठया प्रमाणावर मुस्लिम धार्मिक साहित्य अवैधरीत्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला का ? हे पाहण्यासाठी तपासाची घोषणा करण्यात आली. या साहित्यामध्ये कुराणचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचा मोठा तळ असणारे अफआणिस्तानमधील बगराम बेस या ठिकाणी मुस्लिम साहित्य नष्ट करण्यात आले होते.  
यामुळे अफगाणिस्तानच्या मुख्य सचिवांचे विशेष प्रतिनिधी जान कुबीस यांनी मौलवी कियामुद्दीन कशाफ यांच्यासोबत अफगाणिस्तानातील उलेमा परिषदेच्या अध्यक्षांची काबूलमध्ये भेट घेतली. दरम्यान, आयएसएफ लवकरच तपास प्रक्रिया पूर्ण करून यामध्ये सहभागी असणार्‍यांवर कारवाई करेल असा विश्वास एसआरएसजीने व्यक्त केला आहे.  
या घटनेमुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे आपण यावर दुःख व्यक्त करत आहोत, असे कुबीस यांनी मौलवी यांना सांगितले. तसेच संयुक्त राष्ट* अफगाणिस्तानमधील जनतेचा विश्वास, परंपरा आणि संस्कृतीचा मान राखत असल्याचे कुबीस यांनी सांगितले. अमेरिकी जनरल आणि अमेरिका व नाटोचे मुख्य कमांडर जॉन अॅलन यांनी देखील या प्रकरणामुळे अफगाणी जनतेची आणि अधिकार्‍यांची माफी मागितली आहे. तसेच तपासाचे आदेश दिले असल्याचे कुबीस यांनी सांगितले.

Leave a Comment