कोलकाता बलात्कारप्रकरणी सीपीएमचा ममता बॅनर्जींवर निशाणा

कोलकाता-कोलकातामध्ये रविवारी झालेल्या सीपीएम पक्षाच्या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जबर टीका करण्यात आली. कोलकात्यात अलीकडेच एका महिलेवर झालेला बलात्काराचा मुद्दा या टीकेचा केंद्रबिदू होता. यावेळी माजी मुख्यमंत्री बुद्धादेब भट्टाचार्य उपस्थित होते. सीपीएम पक्ष सत्तेत असताना आयोजिलेल्या त्यांच्या कोणत्याही मेळाव्यापेक्षा रविवारचा मेळावा सर्वात मोठा होता असे ते म्हणाले.

कोलकात्यात झालेला एका महिलेवरील कथित बलात्काराचा मुद्दा या मेळाव्यामध्ये सीपीएमने उचलून धरला होता. या घटनेची कोणतेही चौकशी न करता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काहीही झाले नसल्याचे सांगितले, अशी टीका भट्टाचार्य यांनी या मेळाव्यात केली. उलट पक्षी सीपीएमचा हा मेळावा म्हणजे एक नाटकच आहे, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसने सीपीएम पक्षावर पलटवार केला आहे. सीपीएमने आता ३५ वर्षे गप्प राहिले पाहिजे असा टोलाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे. तसेच, बलात्काराच्या प्रकरणाचा मुद्दा गाजवून विरोधी पक्ष आपल्याला लक्ष्य करित असल्याचे सांगून हा डाव सीपीएमवरच उलटवण्याचा प्रसत्न ममता बॅनर्जी यांनी केला.

‘आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकत नाही. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याआधी सीपीएमने स्वतःचे परिक्षण केले पाहीजे. आरोपी आरोप करत आहेत’, असे तृणमूलचे नेते पर्थ चॅटर्जी यांनी सांगितले. सीपीएम वार करण्याच्या स्थितीत आहे. पण ममता बॅनर्जी यांना जनतेचा पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment